Last Updated on 06 Oct 2022 7:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा 63 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, सौ. जयश्री पाटील, वसंतराव शिंदे, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, की कामगार हा संस्थेतील महत्वाचा घटक आहे. कर्मचारी नेहमी सभासदांसाठी कार्यरत असून, कर्मचाऱ्यांच्या साथीने कृष्णा कारखाना प्रगतीपथावर आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण सुरु असून, ते पूर्णत्वाकडे जात आहे.येत्या काळात कारखान्याच्या यंत्रसामग्रीमध्ये बरीच सुधारणा करावी लागणार आहे.तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच त्यांना लवकरच वेतनवाढ दिली जाईल.शिवाय त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यास संचालक मंडळ कटीबद्ध आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कारखान्याचे आधुनिकीकरण सुरु केल्याने येणारा काळ हा सर्वांसाठी उत्कर्षाचा असणार आहे. या हंगामात १६ लाख टनापर्यंत गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सभासदांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा. कृष्णा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कृष्णा आर्थिक परिवारातील संस्थांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.
प्रारंभी मच्छिंद्रगडावरून आणलेल्या ज्योतीचे व जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या नवीन स्कूलबसचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला वैभव जाखले, ब्रिजराज मोहिते, पै. आनंदराव मोहिते, प्रदीप पाटील, जयकर कदम, मनोज पाटील, हर्षवर्धन मोहिते, जयवंत नांगरे, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव आदींसह विविध संस्थांचे सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले.
कौतुकाची थाप
पुणे येथे फाऊंटन कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कृष्णा कारखान्यातील सफाई कर्मचारी मनोज हातेकर यांनी सहभाग घेतला आहे. हातेकर याचे सुंदर हस्ताक्षर पाहून अक्षरप्रेमी लोकांनी त्यांना तब्बल 86 हजार 500 रुपयांचा पेन भेट दिला आहे. या यशाबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले व श्री. विनायक भोसले यांनी मनोज हातेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत, त्यांचा सन्मान केला.









































































