Last Updated on 23 Jun 2023 7:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कृषी शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रिभुत प्रवेश प्रक्रिया शनिवार, दिनांक 24 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2023 सामाईक प्रवेश परीक्षा तसेच संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या आहेत,अशा पात्र उमेदवारांनी शनिवार,दिनांक 24 जून 2023 पासून ते रविवार,दिनांक 09 जुलै 2023 पर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करुन प्रवेशासाठी नोंदणी (Registration) करुन ऑनलाईन पध्द्तीने अर्ज स्वीकृती संगणक प्रणालीद्वारे (Online Application System) योग्य कागदपत्रे / प्रमाणपत्र Scan करुन अपलोड करावीत.
उपरोक्त वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांचा प्रवेश अर्ज विहीत मुदतीत भरावा. सविस्तर वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिध्द करण्यात येईल,राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.









































































