Last Updated on 06 Apr 2025 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी सांगली जिल्ह्यात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करत कृषीमंत्री कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यावर या आश्वासनाची फसवणूक झाली आहे. अजित पवारांनी थेट कर्जमाफी शक्य नाही, असे स्पष्ट केले आणि आता कृषीमंत्री कोकाटे म्हणतात की, कर्जमाफी दिली तर शेतकरी लग्न, साखरपुडा यावर उधळपट्टी करतात. हे वक्तव्य केवळ अपमानास्पद नसून, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.”
या निषेधाद्वारे मंत्री कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध करत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पुढील काळात कर्जमाफीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
या आंदोलनात महेश खराडे, भागवत जाधव, प्रकाश देसाई, शिवाजी पाटील, रज्जाक मुलाणी, उत्तम पाटील, दत्ताजी पाटील, साहेबराव पाटील, रामभाऊ जाधव, अनिल गावडे, शंकर पाटील, प्रदीप पाटील, रविकिरण माने, आकाश साळुंखे, सुरेश पश्चिब्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 01 May 2026 10:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit ईश्वरपूर । महाराष्ट्र दिनी राज्यातील जनगणनेच्या डिजिटल पर्वाचा शुभारंभ झाला आहे. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी... Read more












































































