Last Updated on 05 Jul 2024 6:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सिंधुदुर्ग । कुडाळ कार्यक्षेत्रात राष्ट्रीय महामार्गावर गोवा राज्यातुन महाराष्ट्र राज्यात वाहतुक होणारे गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या बिदेशी मद्याची वाहतुक करणारे दोन ट्रक जप्त करून १३ लाख ३३ हजार २०० रुपये किंमतीच्या गोवा वनावटीच्या दारुच्या मुददेमालासावत दोन ट्रक (१८ लाख ५०हजार रुपये) असा एकुण ३९ लाख ८३ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताव्यात घेण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,अंमलबजावणी व दक्षता संचालक,सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उप-आयुक्त विजय चिचाळकर व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कुडाळ व कर्मचारी वर्ग यांनी ही कारवाई केली.

सदर कारवाईमध्ये संशयित इसम १) सईदभाई अनवरभाई सोलंकी (वय ३२, रा. मोजे वांता फलिया अमोद, ता. भरुच, जि. भरुच),धर्मद्रसिंह सुरसिंह ठाकोर, वय ४६, मांजे टंकरा फलिया रानादा अमोद,ता. भरुच जि. भरुच) यांना वाहनासह जागीच ताव्यात घेण्यात आले आहे.एक इसम फरार असुन त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
सदरील कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक मिलींद शिवाजीराव गरुड, दुय्यम निरीक्षक उदय संजय थोरात.दुय्यम निरीक्षक राहुल भिमराव मोरे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत धोंडी ठाकूर,संदीप मोतीराम कदम जवान नि वाहनचालक यांनी केली.










































































