Last Updated on 03 Jan 2024 5:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । टेपरेकॉर्डर मोठ्या आवाजात गाणी लावून बेफाम वेगात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊसाच्या मोळ्या रस्त्यावर पडल्या.हा प्रकार आज,मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वाजता घडला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून हे निदर्शनास आणून दिले.नंतर त्यांनीच चालकाला ऊस ट्रॉलीत भरण्यास मदत केली.
इस्लामपूर शहरातील शंभर फुटी रस्त्यावरून टेपरेकॉर्डर मोठ्या आवाजात गाणी लावून बेफाम वेगात रात्री ९ च्या सुमारास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता.त्याचवेळी ट्रॉलीतील ७००ते ८००किलो ऊसाच्या मोळ्या खाली पडल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव हेही त्याचवेळी तेथून निघाले होते.हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.त्यांनी लगेच ट्रॅक्टरचा पाठलाग करत ट्रॅक्टर चालकास थांबवून ट्रॅक्टर चालकाला समज देऊन ऊस भरण्यासाठी भाग पाडले.व जाधव यांनीही ट्रॅक्टर चालकाला ऊस ट्रॉलीत भरण्यास मदत केली.

१८ महिने पिकवलेल्या शेतकऱ्यांनी रात्र दिवस काबाडकष्ट करून पिकवलेला आपला ऊस कारखान्यावर जातो की रस्त्यात पडला जातो हे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पहिले पाहिजे.आपला ऊस साखर व्यवस्थित कारखान्यापर्यंत जातोय का,ऊस व्यवस्थित बांधला आहे का? हे पहिले पाहिजे.तसेच ट्रॅक्टर चालक-मालक एंट्री घेतात हे थांबले पाहिजे.अजूनही पहिला हप्ता जमा नाही.
भागवत जाधव
तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना










































































