Last Updated on 27 Jan 2024 10:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करण्याच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू वृत्ती आणि संकल्पना असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, देवेंद्रजी यांचा सुरुवातीपासूनच हाच प्रयत्न होता की, मराठा आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसेल,अशा प्रकारचे मराठा बांधवांना देण्यात यावे. कारण कायद्याच्या चौकटीत न बसणारे आरक्षण दिलं तर ती मराठा समाजाची फसवणूक होईल,हे त्यांना चांगल्या तऱ्हेने माहीत होते.परंतु महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवता आलं नाही. सुरुवातीपासूनच आम्ही म्हणत आहोत की, मराठा बांधवांना आरक्षण मिळणार आणि तेही कायद्याच्या चौकटीत टिकेल,असं आरक्षण युती सरकार देणार आहे.राज्य सरकारचे खूप खूप विशेष आभार.आता सर्वांनी जातीपातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडून एक हिंदू म्हणून एकत्र या,एवढीच प्रार्थना.






































































