Last Updated on 25 Oct 2022 8:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यांना सरकार कडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र किती मंत्र्यांनी दौरे करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे? असा सवाल माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केला.काम काहीही करायचे नाही,मात्र श्रेयासाठी बॅनरबाजी करण्याची नवी संस्कृती तालुक्यात आली असल्याचा टोलाही त्यांनी दिला.
आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते रेठरे हरणाक्ष,भवानीनगर,कि.म.गड व नरसिंहपूर येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील,सुस्मिता जाधव, रेठरे हरणाक्षचे बी.डी. पवार,जे.डी.मोरे,सरपंच मारुती कांबळे,उप सरपंच निलेश पवार, भ.नगरचे बाळासाहेब पाटील,भरत कदम,सरपंच कांबळे, कि.म.गडचे सुनील पोळ,सरपंच कोमल झेंडे,नरसिंहपूरचे बबनराव दौलू सावंत,सरपंच प्रविण पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. नरसिंहपूर येथे राजवर्धन सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. प्रा.शामराव पाटील,नेताजीराव पाटील उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,काही मंडळी समाजात संभ्रम,गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग करीत आहे आहेत. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत असून सरकार अन्नधान्या पासून कापड,चप्पल आदी वस्तूवर कर बसवीत आहे. आपल्या रुपयाच्या अवमूल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. देशात लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे, सत्तेचे केंद्रीकरण केले जात आहे. राज्यात आपले सरकार नाही. तरीही लोकांचे हित जपत संघटना वाढविण्याचे काम करा.
भवानीनगर येथे माजी सरपंच बाळासाहेब पाटील म्हणाले,विरोधकांनी विकास कामात आडवा पाय घालण्याचा,तसेच खोटे बोल,पण रेटून बोल हा उद्योग बंद करावा. सरपंच राजेश कांबळे म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांचे प्रयत्न आणि ग्रामपंचायतच्या पुराव्याची कागदपत्रे खुली केली आहेत. रेठरेहरणाक्षचे सरपंच कुमार कांबळे,उपसरपंच निलेश पवार,भ.नगरचे भरत कदम,अंकिता सावंत, सौरभ सावंत,नरसिंहपूरचे राजारामबापू दूध संघाचे संचालक बबनराव सावंत,कि.म.गडचे माजी पं.स.सदस्य सुनील पोळ,सरपंच कोमल झेंडे,उपसरपंच राहुल निकम,तानाजी यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.
रेठरे हरणाक्षचे धनाजी बिरमुळे,दादासो मोरे,सुजित मोरे,दिलीपराव मोरे,सुरेश पवार, कल्पना कोळेकर,भ.नगरचे दीपक घाडगे, डॉ.सुशील सावंत,डॉ.विकास माळी,हरिभाऊ सावंत,जयश्री कदम,शंकरराव मोहिते, विजयकुमार सावंत,अशोक गोडसे,सौ.ज्योती मेहता,कि.गडचे हणमंत मोरे,भीमराव देशमुख,दिनकर कदम,व्यंकटराव जाधव, अण्णा पवार,सुस्मिता कांबळे,सिकंदर जमादार,नरसिंहपूरचे सरपंच प्रविण सावंत,कृष्णेचे माजी संचालक संपतराव सावंत,सोसायटीचे अध्यक्ष दिनकर कदम,उपाध्यक्ष माणिक पाटील,पै.भरत पाटोळे,उपअभियंता आर जी.कांबळे यांच्यासह गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













































































