Last Updated on 28 Nov 2023 10:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कापूसखेड (ता. वाळवा) येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.येथील जोतिर्लिंग मंदिर, सिध्दनाथ जोगेश्वरी मंदिर, हनुमान मंदीर, भजनी मंडप परिसर तसेच दगडी दीपमाळ या ठिकाणी हजारो दिवे लावण्यात आले होते.

त्यासाठी जवळपास 50 लिटर तेल लागले.दुपारी तीनपासून याची तयारी सुरू होती.पणत्या ठेवण्याच्या जागेवर रांगोळी काढण्यात आली होती.सहा इंचाच्या अंतरावर पणत्या ठेवल्या होत्या.सायंकाळी सातच्या सुमारास जोतिबाच्या देवालयात पुजारी महादेव गुरव, संदीप गुरव यांच्याहस्ते विधिवत पुजा करून पणत्यांच्या ज्योती प्रज्वलीत केल्या गेल्या.
अवघ्या दहा मिनिटात हजारो पणत्या उजळून हा परिसर तेजोमय होवून गेला. दीपोत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. सामाजिक कायकर्ते माणिक माळी यांच्यासह युवक,ग्रामस्थांनी याचे संयोजन केले.












































































