Last Updated on 04 Nov 2024 4:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
या मतदारसंघातून काँग्रेसकडून पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्या उमेदवारीला नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे उमेदवारी बदलली. मधुरिमाराजेंना उमेदवारी दिली. तर लाटकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. सोमवारी सकाळपासून लाटकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. उमेदवारी नाकारलेले राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने गोंधळात भर पडली आहे.
हेही वाचा – पुणे शहरात महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात अपयश
आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटांत खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी उमेदवारी मागे घेतली. राजेश लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी मधुरिमाराजे छत्रपती यांचा अर्ज मागे घेत असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.
दरम्यान, राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये रद्द करण्यात आली. मात्र, आता नव्याने दिलेल्या उमेदवारानं सुद्धा उमेदवारी माघार घेतल्याने काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये राहिलेला नाही, अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.











































































