Last Updated on 27 Oct 2024 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण १४ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आता काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे, चौथ्या यादीमध्ये एकूण १४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने आत्तापर्यंत ९९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ८५ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ७६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
अमळनेर -अनिल शिंदे उमरेड – संजय मेश्राम अरमोरी- रामदास मसराम चंद्रपूर- प्रवीण पडवेकर बल्लारपूर – संतोषसिंग रावत वरोरा -प्रवीण सुरेश काकडे नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे नालासोपारा – संदीप पांडे अंधेरी पश्चिम – अशोक जाधव पंढरपूर – भगिरथ भालके सोलापूर दक्षिण- दिलीप माने शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे यांना संधी मिळाली आहे.
चौथ्या यादीत विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत मात्र मुंबई सोबतच औरंगाबाद पुर्वच्या जागेवर ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे उमेदवारांचा फेरबदल झाला आहे. अंधेरी पश्चिममधून सचिन सावंतांच्या जागेवर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर औरंगाबार पूर्व येथून मधुकर देशमुखांच्या जागेवर लहू शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचाही तिढा सुटला असून दिलीप मानेंची उमेदवारी निश्चित झाली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या भगिरथ भालकेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे कॅन्टॉन्मेंटमधून माजी मंत्री रमेश बागवे यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दत्ता बहिरट यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.
चौथी यादी……………………
अमळनेर – अनिल शिंदे
उमरेड (अजा) – संजय मेश्राम
अरमोरी (अज)- रामदास मसराम
चंद्रपूर(अजा) – प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोष सिंग रावत
वरोरा – प्रवीण काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार गफुर
औरंगाबार पूर्व – लहू शेवाळे (मधुकर देशमुखांच्या बदल्यात)
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव (सचिन सावंतांच्या बदल्यात)
शिवाजी नगर – दत्तात्रय बहिरत
पुणे कँटोन्टेनमेंट (अजा) – रमेश भागवे
सोलापूर दक्षिण – दिलीप माने
पंढरपूर – भागिरथ भालके
तिसरी यादी………………………….
खामगाव – राणा दिलीपकुमार सानंदा
मेळघाट- डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदेड साऊथ – मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
मुखेड – हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य -एजाज बेग अली बेग
चांदवड – शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी – लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम – दयानंद चोरगे
अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
वांद्रे पश्चिम – असिफ झकारिया
तुळजापूर – कुलदीप थिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर
सांगली – पृथ्वीराज पाटील
दुसरी यादी……………………….
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गांगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठावकर
अर्जुनी-मोरगाव – दलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल (बाळासाहेब) मंगुळकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बढेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगळे
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
पहिली यादी……………………………………..
1.अकलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत









































































