Last Updated on 14 May 2023 5:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे.काँग्रेसला 135 जागी विजय मिळाला आहे.भाजपचे पानिपत झाले आहे.भाजपला जेमतेम 66 जागांपर्यंत मजल मारता आली आहे.तर भाजप सत्ता राखण्यात अपयशी ठरला आहे. सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील 38 वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे.या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली.
मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारमधील अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बी श्रीरामुलू, के सुधाकर, जेसी मधुस्वामी, गोविंद करजोल, एमटीबी नागराज जेसी नारायण गौडा आणि विधानसभा अध्यक्ष व्ही. हेगडे यांच्या नावांचा समावेश आहे. बसवराज बोम्मई यांनी शिग्गाव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येदियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हे शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराकडून 34 हजार मतांच्या फरकानं पराभव झाला.माजी मुख्यमंत्री आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी चन्नापटना विधानसभेची जागा जवळपास 16 हजार मतांनी जिंकली. प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख डी के शिवकुमार 1 लाख 22 हजार 292 मतांच्या आघाडीनं निवडून आले तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी 46 हजार 163 मतांनी विजय मिळवला आहे. चित्तापूर मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी भाजपच्या मणिकांत राठोड यांचा 13 हजार 640 मतांनी पराभव केला आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या 18 मतदारसंघांपैकी 11 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आणि 7 ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
हे 5 महत्त्वाचे निर्णय; राहुल गांधींची घोषणा
कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला 2 हजार रुपये या घोषणांचा समावेश आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही या 5 आश्वसनांची पूर्ती करण्यासाठी मंजुरी देऊ, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे.या एकहाती विजयामागे काँग्रेसने दिलेल्या पाच घोषणांचा समावेश आहे.यानुसार गृहलक्ष्मी योलनेंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला 2 हजार रुपये देण्यात येणार आहे. युवानिधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानुसार दोन वर्षांसाठी कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना 3 हजार रुपये प्रति महिना आणि बेरोजगार डिप्लोमाधारकांना 1500 रुपये प्रति महिना जाहीर करण्यात आला आहे.
निकालाची ताजी आकडेवारी अशी
एकूण जागा – 224 बहुमतासाठी आवश्यक – 113
भाजप…………………..66
काँग्रेस…………………135
जेडीएस…………………19
इतर………………………4

2018 चा निकाल
यापूर्वी 2018 च्या कर्नाटक निवडणुकीत 224 जागांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.104 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.काँग्रेसच्या खात्यात 80 जागा होत्या.जेडीएसचे 37 उमेदवार विजयी झाले होते.
दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला 42.98 टक्के, भाजपला 35.91 टक्के तर जेडीएसला 13.33 टक्के मतं मिळाली आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेसला 0.27 टक्के आणि नोटाला 0.69 टक्के मतं मिळाली आहेत.
बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे.पक्षाच्या विजयी उमेदवारांसह ज्येष्ठ नेत्यांची उद्या बंगळुरूमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.यासाठी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह आणखी एक निरीक्षक पाठवला जाणार अशी चर्चा आहे.या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिगगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पठाण यासिर अहमद खान यांचा जवळपास ३६ हजार मतांनी पराभव केला.
एक्झिट पोलची आकडेवारी













































































