Last Updated on 04 Jul 2025 5:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बा विठ्ठला… सरकारला बुद्धी दे! : तुफान गर्दीत शेतकऱ्यांचं आंदोलन
पंढरपूर । राज्यातील शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडूरंगास साकडे घातले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतक-यांचा सात बारा कोरा करून संपुर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतक-यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपूरात आज शेतक-यांना मोठी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकड घालण्यात आले. राज्य सरकारला जर शेतक-यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्दी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचे साकडे घालण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच १२ जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते.







































































