Last Updated on 22 May 2023 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गेल्या आर्थिक वर्षामधील याच महिन्याच्या तुलनेत 19 टक्के टक्के वाढ
एप्रिल 2023 मध्ये 250 दशलक्ष पेक्षा जास्त ई-केवायसी व्यवहारांची नोंद
नवी दिल्ली | आधार कार्ड धारकांनी एप्रिल 2023 मध्ये 1.96 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार केले आहेत. एप्रिल 2022 च्या तुलनेत यामध्ये 19.3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली असून, ती डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ आणि भारतातील आधार कार्डचा वापर दर्शवते. यापैकी बहुतांश प्रमाणीकरण व्यवहार बोटांच्या ठशां द्वारे, तर त्या पाठोपाठ लोकसंख्या शास्त्र आणि ओटीपी वर आधारित होते. सुलभ सेवा वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशनचा (चेहरा ओळख) देखील सर्व क्षेत्रांमध्ये चांगला वापर होत आहे.
आधार सक्षम पेमेंट प्रणाली (AePS), अल्प उत्पन्न गटांचा आर्थिक समावेश सुलभ करत आहे. एप्रिल 2023 मध्ये, AePS आणि मायक्रो ATM च्या नेटवर्कद्वारे, शेवटच्या टोकापर्यंत 200.6 दशलक्ष पेक्षा जास्त बँकिंग व्यवहार करता आले.
ग्राहकांना पारदर्शक आणि सुधारित अनुभव प्रदान करून आणि व्यवसाय सुलभतेला मदत करून, बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवा क्षेत्रात आधार ई-केवायसी सेवा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केवळ एप्रिल महिन्यात 250.5 दशलक्ष पेक्षा जास्त ई- केवायसी व्यवहार करण्यात आले.









































































