Last Updated on 04 Dec 2025 4:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नंबर प्लेट बसवून घेण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड | केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणताही दंड टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची / उत्पादकाची निवड करण्यात आली असून वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याकरिता ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे.
मोटार सायकल व ट्रक्टरसाठी दर 450 रुपये, तीन चाकी वाहनांकरिता 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता 745 रुपये इतका दर आकारला जाणार असुन याव्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे. सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. यादरांव्यतिरीक्त फिटमेंट सेंटरकडुन एचएसआरपी बसविण्याकरिता जादा पैस्याची मागणी करत असेल तर या कार्यालयास त्याबाबत तक्रार दाखल करता येईल.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याकरिता Appointment घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ज्यांची वाहने वाहनधारकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांना पुन:श्च आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरून 31 डिसेंबर 2025 पूर्वी बसवून घ्यावी अन्यथा वाहनाचे कुठलेही काम असो जसे की, वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इ. वाहना संबंधी कामकाज होणार नाहीत. त्यामुळे वाहनांच्या कामकाजाचा खोळंबा होणार आहे. तसे नकेल्यास मोटार वाहन कायद्यानुसार एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविण्यासाठी दंड आकारणी परिवहन विभागातर्फे करण्यात येईल. हा दंड टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असेही आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 25 Oct 2026 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ही लोकशाही केवळ संविधानावर आधारित नसून, ती निवडणुकांच्या प्रक्रियेद्व... Read more










































































