Last Updated on 21 Apr 2025 6:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा शेतीत रमल्याचे पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड केली.
दरे या माझ्या मूळ गावातील मुक्कामात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड केली. दरवर्षी गावी सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यापूर्वी त्यांनी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले.

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.












































































