Last Updated on 01 Jan 2024 9:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अयोध्या येथील मीरा मांझी यांच्या घरी भेट दिली.या योजनेच्या त्या १० कोटी’व्या लाभार्थी आहेत. त्यांची ही भेट चांगलीच चर्चेची ठरली.अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन झाले.या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागतही झाले.या कार्यक्रमात सर्वात चर्चेची ठरली ही भेट होती.
या भेटीनंतर पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:भगवान श्रीरामाच्या नगरामध्ये भगिनी मीरा मांझी यांच्या घरी भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला आहे.असे लिहिले आहे. या पोस्टमध्येच या भेटीचे काही फोटोही त्यांनी शेअर केले.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेतात.त्याची बरीच चर्चा होते.पण, ही भेट थोडी वेगळी होती.म्हणून त्याची चर्चा अधिक रंगली.








































































