Last Updated on 01 Dec 2023 6:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्ष पदी भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका अध्यक्ष निवास शामराव पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र वाळवा तहसिल विभागाचे तहसिलदार प्रदिप उबाळे यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत निवास शामराव पाटील यांनी निवडीचे पत्र स्विकारले.
यावेळी सदस्य म्हणून उत्तम लक्ष्मण कदम,मुकुंद विठ्ठल रास्कर, निलेश माणिक बाबर, निलेश मारूती कांबळे,वसंत भगवान कदम,रफिक(सरगम) शमशुद्दीन मुल्ला यांची निवड करण्यात आली.यावेळी सर्व सदस्यांनी वाळवा तहसिल विभागाचे तहसिलदार प्रदिप उबाळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्विकारले.
यावेळी भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका अध्यक्ष व नुतन वाळवा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्ष निवास शामराव पाटील म्हणाले राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्हयाचे पालकमंत्री सुरेश खाडे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी खर्या अर्थाने माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी देवून खर्या अर्थाने माझा सन्मान केला आहे. या पदाच्या माध्यमातून काम करीत असताना कोणताही भेदभाव, पक्षपाती पणा न करता अत्यंत प्रामाणिक व श्रध्देने सर्वाना बरोबर घेवून ही जबाबदारी पार पाडणार आहे.तालुक्यातील अगदी वाडी वस्ती पर्यंत या योजनेची माहिती पोहचवून योग्य व्यक्तीला या योजनाचा लाभ देण्यासाठी मी कटिबध्द राहणार आहे.

यावेळी उरूण-इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक वैभव पवार,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण माने, शिगावचे माजी लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे, भाजपा इस्लामपूर शहर मंडलचे उपाध्यक्ष आबासाहेब मोरे, सयाजी जाधव, भाजपा इस्लामपूर शहर मंडलचे सरचिटणीस प्रविण परीट, निशिकांत दादा युथ व स्पोर्ट फौंडेशनचे अक्षय पाटील,अजित पाटील,संजय हवालदार सुभाष जगताप,जागर पाटील,रामचंद्र पाटील.









































































