Last Updated on 26 May 2023 7:45 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मार्च 2023 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवण्याची परंपरा यावर्षीही इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाने कायम राखली.महाविद्यालयाचा एकूण निकाल 96 टक्के लागला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी दिली.
शाखेनुसार प्रथम विद्यार्थीनी पुढीलप्रमाणे
विज्ञान शाखा –
प्रथम – अनुसे शितल मारुती
द्वितीय – पाटील तनिष्का शरद
तृतीय – अनुसे श्रेया कृष्णदेव
वाणिज्य शाखा-
प्रथम – डुबले राजश्री आबासाहेब
द्वितीय – कणसे साक्षी सुनील
तृतीय- पाटील प्रतिमा बाबासो
कला शाखा –
प्रथम – गायकवाड दिव्या नागेश
द्वितीय – बाबर अनुजा अशोक
तृतीय – मोमीन नाविरा इम्तियाज
संस्थेचे मार्गदर्शक माननीय आमदार जयंतरावजी पाटील,अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर. डी. सावंत,प्राचार्य डॉ. विलास काळे व पर्यवेक्षिका डॉ. संगीता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.











































































