Last Updated on 24 Jun 2023 12:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या मऱ्हाठमोळा नृत्य करंडक स्पर्धेत इस्लामपूर येथील वाय.सी. कॉलेज व कोल्हापूर येथील ज्ञानरत्न रत्नाप्पा कुंभार कॉलेज यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.
इस्लामपूर येथे मऱ्हाठमोळा नृत्य करंडक स्पर्धा राजारामबापू नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडल्या.विश्वास सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक बी.डी. पवार,राजारामबापू सहकारी साखर कारखाऱ्यांच्या संचालिका डॉ.योजना शिंदे,माजी नगरसेवक शिवाजी पवार आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इस्लामपूर येथील वाय.सी. कॉलेज व कोल्हापूर येथील ज्ञानरत्न रत्नाप्पा कुंभार कॉलेज यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.तसेच द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत,पलूस व कला विश्व अकॅडमी,इस्लामपूर यांना विभागून देण्यात आला व तृतीय क्रमांक व्ही.के.स्टाईल,कर्नाटक यांना देण्यात आला.उत्तेजनार्थ एस ग्रुप निमशिरगाव,सुष्टि जाधव,वर्षा तिवारी,मास्टर देवराज यांना देण्यात आला.या स्पर्धेमध्ये कलाकारांनी जोगवा,धनगरी नृत्य, देवीनृत्य तसेच महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन,दांडार,रायबेंशो,गौर आदी विविध लोकनाट्य कलाप्रकार सादर केले.
उद्योजक अभिजीत पिसे, गणेश निकम,जाधव सर, जयसिंगराव पाचेगावकर,लंका पाचेगावकर,सोपान नाना,लोककलावंत अभ्यासक मुरलीधर शिंदे,रामचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.संयोजन मऱ्हाठमोळा युवक मंडळाचे संस्थापक सुरेंद्र पाटील,अध्यक्ष राकेश पाटील,हेमंत पाटील,शिवराज पाटील, दिग्विजय पाटील,रोहन देसाई,गणेश जाधव,विश्वजित पाटील ओंकार हुबाले आदींनी केले.












































































