Last Updated on 30 Oct 2022 11:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन एसी यांचे इस्लामपुर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या वतीने उरुण इस्लामपुर नगरपरीषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी शायना एन सी यांनी इस्लामपुर विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला,भाजपा पक्षाची या मतदार संघात रचना चांगली झाल्याचे सांगुन संघटनात्मक कामाचे कौतुक करत निशिकांत भोसले पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव व सोलापुर जिल्हा युवा मोर्चाचे प्रभारी प्रविण फौंडे,भाजपा वाळवा तालुका महिला आघाडी च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वंदना थोरात,भाजपा वाळवा तालुका उपाध्यक्ष अरविंद पाटील,निवास पाटील,भाजपा जिल्हा चिटणीस संजय हवलदार,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,संजय पोरवाल, वाळवा तालुका भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, इस्लामपुर भाजपा शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट,भाजपा अल्पसंख्यांक चे अध्यक्ष अल्ताफ तहसिलदार,महेंद्र मंडपाळकर,धनाजी पाटील,शरद अवसरे,अधिकराव मोरे,रविंद्र पिसाळ,गौरव खेतमर,अक्षय पाटील, अक्षय कोळेकर,सुयश पाटील,बंडु कोळेकर,रामभाऊ शेवाळे,रामचंद्र उदुगडे,सुभाष जगताप आदिसह अन्य मान्यवर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()












































































