Last Updated on 28 May 2023 1:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अभय पाटील 93.83 टक्के गुण मिळून इस्लामपूर केंद्रात प्रथम
सांगली । फेब्रुवारी – मार्च-2023 मध्ये झालेल्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेमध्ये येथील विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी उत्तुंग यश मिळविले.महाविद्यालयाचा निकाल 98.37 टक्के इतका लागला असून अभय सर्जेराव पाटील या विद्यार्थ्यांने 93.83 टक्के गुण मिळून इस्लामपूर केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
विद्यार्थ्यांना मिळालेले गुण असे : साक्षी भोसले (93.50 टक्के),साईराज पवार (92.17 टक्के),संस्कार माळी (90.83 टक्के),अथर्व भोई (90.17 टक्के),सुशांत कोंडीकीरे (89.83 टक्के),सार्थक कदम (89.33टक्के),मंजिरी जाधव (88.33 टक्के) साहील सुतार (87.50 टक्के) समृद्धी चौगुले (86.17 टक्के),रमीज नाईकवडी (86.17 टक्के),तृप्ती राजमाने (85.67 टक्के) मनस्वी शेखर (85.50 टक्के).
इलेक्ट्रीकल मेन्टेनन्स (EM) या विषयात एकूण 18 विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवून तसेच क्रॉप सायन्स् (Crop) या विषयात 6 विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

याचबरोबर महाविद्यालयात इंग्रजी या विषयात साहिल सुतार 94 गुणांसह प्रथम क्रमांक,मंजिरी जाधव हिने मराठी विषयात 90 गुणांसह प्रथम क्रमांक,भूगोल या विषयात आदित्य देशमुख आणि मंजिरी जाधव यांनी 93 गुणांसह प्रथम क्रमांक,गणित या विषयात अथर्व भोई 98 गुणांसह प्रथम क्रमांक,फिजिक्स विषयात अभय पाटील याने 91 गुणांसह प्रथम क्रमांक,साईराज पवार आणि साक्षी भोसले यांनी केमिस्ट्री या विषयात 96 गुणांसह प्रथम क्रमांक,बायोलॉजी या विषयात तृप्ती राजमाने हिने 97 गुणांसह प्रथम क्रमांक,त्याचबरोबर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स या विषयात साक्षी भोसले,साईराज पवार,सार्थक कदम,तन्वी माने,समृद्धी चौगुले,संस्कार माळी,साहिल तांबवेकर,आर्या गायकवाड,श्रेया सावंत,वैष्णवी यादव,सानिका माने,श्रीवर्धन देशमुख,सानिका पाटील,धनराज गायकवाड,विश्वराज कुलकर्णी,हर्षवर्धन पाटील,इरफान मुल्ला,विनम्र जमदाडे यांनी 200 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.क्रॉप सायन्स या विषयात सारा मिर्झा,सुयश चव्हाण,वेदिका देसाई,राजेश्वरी चौधरी,प्राची कारंडे,सानिका खटकाळे यांनी 200 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.इलेक्ट्रॉनिक्स या विषयात जिशान शेख याने 177 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.तर कॉम्प्युटर सायन्स या विषयात विश्वजीत खंडागळे याने 193 गुण मिळवत आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात स्वरूप पाटील याने 98 गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.
संस्थेचे मानद सचिव ॲड.बी. एस. पाटील,सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील,मुख्याध्यापक एस. एल. पाटील,विभागप्रमुख एस.एस.पाटील,प्रा.एस. आर. नागरगोजे,प्रा. बी. ए. शिरोटे,प्रा.एस. आर. महिंद,प्रा.एम. पी. करळे,प्रा.मकरंद बडवे,प्रा.डी. ए. जाधव,प्रा.आर. व्ही. पाटील,प्रा. एच. ए. पाटील,प्रा. बी. एस. मुल्ला,प्रा. अशोक धुमाळ,प्रा. विजय जाधव,प्रा. अमित दुधाळे,प्रा. धनंजय जाधव,प्रा. वाय. आर. माने मॅडम,प्रा. एस. एन. पाटील मॅडम,प्रा. एस. ए. पाटील मॅडम,प्रा. वंदना पाटील,प्रा. माया विभुते,प्रा. अनुराधा पवार,प्रा. सुजाता देसाई,प्रा. एस. डी. खोत,प्रा. दिपाली कडबाने,प्रा. स्मिता ढोबळे,प्रा प्रतिभा मोहिते,प्रा. अस्मिता पाटील,प्रा. सुषमा पाटील, यांनी हार्दिक अभिनंदन केले.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाने मारली बाजी,यंदाही मुलींचीच बाजी












































































