Last Updated on 17 May 2023 4:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूल ( सी.बी.एस.सी बोर्ड) इयत्ता १० वी चा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असुन प्रकाश पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.या यशस्वी वाटचालीबद्दल विद्यार्थी,विद्यार्थीनी,शिक्षक व स्कुल व्यवस्थापन यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीची ( सी.बी.एस.सी बोर्ड ) परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली.सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शाळेतील आयुष रायगांधी याने ९९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,अंकित अभिजित याने ९७.६ गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर संस्कृती जगताप व यशवर्धन थोरात या दोघांनी ९७.२ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला.
शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के तर १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्केच्या पुढे गुण संपादन केलेले आहेत.मराठी,गणित,सामाजिक शास्त्र,संस्कृत या विषयात विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले.कु.अंकित अभिजित व आयुष रायगांधी यांनी संस्कृत व गणित विषयात १०० गुण मिळवले तर आदित्य लोखंडे याला मराठी विषयात १०० गुण तर यशवर्धन थोरात व संस्कृती जगताप यांनी सामाजिक शास्त्र विषयात १०० गुण मिळवले
प्रकाश शिक्षण,आरोग्य व उद्योग समुहाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील (दादा),प्रशासिका सौ.सुनीता निशिकांत भोसले-पाटील,प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार नायर,उपप्राचार्या सिंधू नायर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.











































































