Last Updated on 03 Jun 2023 6:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये इस्लामपूर येथील सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के तर प्रशालेचा निकाल 94 टक्के लागला.प्राचार्या सौ.एस.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेत यशाचे शिखर गाठले.आसिया जलाल बागवान हिने 94 टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.
विद्यार्थिनींना गुणानुक्रमे मिळालेले यश असे
1. आसिया जलाल बागवान – 94.40 टक्के
2. धनश्री प्रशांत रास्कर – 89.40 टक्के
3. प्रांजल भानुदास माळी – 85.40 टक्के
संस्थेचे मानद सचिव ॲड.बी. एस. पाटील,संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील,प्राचार्या सौ.एस. एस. पाटील,पर्यवेक्षक एस. डी. यादव सर,सौ.यू. एस. पाटील,ए. व्ही. शहा,सोै आर. ए. मिरजे मॅडम,सौ एस. के. खोत,सौ पी. जी. पाटील,सौ के. बी. वाकळे,सौ जी. एस. पाटील,सौ एस. जे. मोरे,एस. एम. पोवार,एन. एन. रास्कर व एस. एस. नानंग यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.












































































