Last Updated on 15 Sep 2023 9:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शासकीय विभागीय नेहरूचषक हॉकी स्पर्धेमध्ये वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इस्लामपूरच्या १५ वर्षाखालील मुलांच्या संपाने कोल्हापूर जिल्हा संघाचा पराभव करीत नेत्रदिपक विजय प्राप्त केला. या संघाची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सांगली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत याच विद्यालयाच्या १५ वर्षाखालील मुले व १७ वर्षांखालील मुले या दोन्ही हॉकी संघांनी विजय प्राप्त केला होता. विभागीय स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पाहिला सामना कोल्हापूर मनपा संघाबरोबर झाला.हा सामना विद्यामंदिर संघाने ३ विरुद्ध १ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.अंतिम फेरीत कोल्हापूर जिल्हा संघांचे नेतृत्व करणाऱ्या डी.सी. नरके विद्यालय कुडित्रे संपाचा पेनल्टी स्ट्रोकवर ४ विरुद्ध २ गोलने पराभव करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा संप पात्र ठरला.
या संघातील संकेत जाधव,ऋतुराज रोकडे,सम्राट देशमुख,यश कुटे,जयवर्धन खुडे,राजवर्धन पाटील,आशिष वडार,ओम माळी व गोलकिपर उसेद मुजावर या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले.तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या हॉकी संघ विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला.
हेही वाचा – ॲड.बी.एस.पाटील (अण्णा) यांचा वाढदिवस…एका अनोख्या उपक्रमाने साजरा!
दोन्ही संघाना एस. डी. पाटील ट्रस्टचे मार्गदर्शक व राष्ट्रीय खेळाडू संजय पाटील,संजय चरापले,संजय चव्हाण,राजेंद्र खंकाळे,सत्यजित पाटील, सत्यशील पाटील,सुरज काळे,विनायक पाटील,महेश कदम,ट्रस्टचे आजी माजी खेळाडू त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. पाटील,क्रीडाशिक्षक श्री.एस.बी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड..बी.एस. पाटील,संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












































































