Last Updated on 15 Sep 2023 7:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव ॲड. बी एस पाटील (अण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू सस्नेह भेट म्हणून रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले,
संस्थेचे सहसचिव,युवा नेते ॲड. धैर्यशील पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या संस्थेच्या विविध शाखांची माहिती देणारे व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारे रायटिंग पॅड संस्थेच्या वतीने इयत्ता 11 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने 19 वर्षाखालील शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर मुलांच्या व मुलींच्या दोन्हीही संघाने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे यातील यशवंत, गुणवंत आणि किर्तीवंत खेळाडू ज्योतिरादित्य पाटील,राजवर्धन पाटील,आदिराज पवार आणि ऋषिकेश कदम तर मुलींच्या मध्ये संस्कृती माने,मानसी पवार व प्रणाली वडार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा – सारथी शैक्षणिक शिष्यवृत्ती; असा करा अर्ज!
संयोजन,स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य एस एल पाटील यांनी केले.यावेळी विभाग प्रमुख एस. एस. पाटील,एस आर नागरगोजे,बी ए शिरोटे,एम पी करळे,एस आर महिंद,आर व्ही पाटील,एच ए पाटील,डी एस मुल्ला तसेच सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.सूत्रसंचालन व्ही एस शिंदे यांनी केले तर आभार मकरंद बडवे यांनी मानले.व्ही. एच. जाधव,ए. एम. दुधाळे,डी. बी. जाधव,ए. ए. गायकवाड,वाय. आर. माने,एस. एन. पाटील,एस. बी. पाटील,ए. टी. पाटील,एस. डी. खोत,एम. व्ही. विभुते,ए. एच. पवार,एस. जी. ढोबळे,डी. सी. कडबाने,एस. बी. देसाई,ए. डी. पाटील,पी. आर. मोहिते,आर. आर. सिसाळे,एस. पी. पाटील,ए. बी. पाटील.ए. एस. जाधव,पी. पी. पाटील,व्ही. डी. पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर. डी. कांबळे,दशरथ रासकर,अतुल पाटील व ऋषिकेश पाटील उपस्थित होते.












































































