Last Updated on 03 Aug 2024 6:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त बापू या चरित्र ग्रंथाचे एक दिवशीय पारायण इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये करण्यात आले. या अभिनव उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व.बापूंचे चरित्र व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती महिला व तरुणींना व्हावे,या भावनेने आम्ही हा उपक्रम राबविल्याचा विश्वास जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, प्राचार्या दीपा देशपांडे,प्रदेश सदस्या कमल पाटील,शहर उपाध्यक्षा योगिता माळी यांनी ग्रंथ वाचन केले. प्रा.शामराव पाटील,महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा.शामराव पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी वैचारीक, संविधानावरती शिबिरे घ्यावीत,अशी सूचना केली. ते म्हणाले,बापू संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नव-नवीन संधी देत असत. त्यांनी अभ्यास शिबिरे घेऊन तरुण कार्यकर्ते घडविले आहेत.
जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या, स्व.बापूंच्या विचारांचे वाचन व प्रसार व्हायला हवा. आम्ही भाऊबीजला तुतारी वाजविणारा माणूस चिन्हाच्या पाच हजार राख्या तयार केल्या असून त्या घरोघरी पोहचविणार आहे.
सुनिता देशमाने म्हणाल्या,बापूंनी तालुक्या त हरित क्रांती घडवून आणली आहे. ऋतूजा माने,वैभवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
अलका माने,उज्ज्वला पाटील,वैशाली पाटील,शैलजा जाधव,प्रियांका पाटील,रेखा पवार,जयश्री पवार,रूपाली सपाटे,सायली गोंदील,प्रतिभा पाटील,सुनंदा साठे,जयश्री पवार,मालन वाकळे,नंदा पाटील,स्वाती पाटील,अश्विनी कोकाटे,अनिता गुरव लता पाटील,मनिषा पेठकर,कल्पना कोळेकर, प्रियांका साळुंखे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.











































































