Last Updated on 04 Apr 2022 11:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
योग गुरुकुल अंतर्गतयोग विद्याधाम, पेठ सिद्धनाथ जीम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या योग प्रवेश आणि परिचय वर्गाचा निरोप समारंभ इस्लामपूर नुकताच संपन्न झाला.योग परिचय वर्गाचे विद्यार्थी प्रथमेश जंगम यांच्या गिटार वादनाने तसेच परिचय वर्गाचे शिक्षक विनायक जगताप यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
या निमित्ताने योग परिचय वर्गाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी शिक्षकांचा सत्कार संपन्न केला.संस्थेचे संस्थापक योगगुरू बळवंत फळके यांनी
1 प्राणायाम,
2 योग संजीवन,
3 योगप्रवेश(१ऑनलाईन ,२ऑफलाईन)
4 परिचय (१ऑनलाईन व १ऑफलाईन)
लॅाकडाऊनपासून एवढे वर्ग झाल्याचा खुलासा केला.
तसेच आजपासून योग प्रवेश आणि योग शिक्षक वर्ग जाहीर करून त्याचाही आज उद्घाटन समारंभ संपन्न झाला.योग परिचय वर्गाचे योगशिक्षक विनायक जगताप यांनी आपण वर्ग घेताना आलेले अनुभव सांगितले.
योगशिक्षक अंकुश खोत यांनी योगपरिचय वर्गाला शंभर टक्के उपस्थिती दर्शवणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.योगशिक्षक प्रभाकर जंगम यांनी योगाचे महत्त्व सांगून आनंदी जीवनासाठी आराेग्य,कौटुंबिक सुसंवाद,सामाजिक संबंध आणि आर्थिक नियोजन.यासाठी योग किती महत्त्वाचा आहे आणि या चार स्तंभांवर आनंदाची इमारत कशी उभी असते हे समजून सांगितले.योगशिक्षक निकम सर यांनी होणार्या शिक्षक वर्गा संबंधी माहिती दिली.योगशिक्षक डुबल सर यानी आजपासुन सुरू होणार्या प्रवेश वर्गा संदर्भात माहिती दिली.
हॉलमधील मिळालेल्या सुविधांबद्दल योग शिक्षिका चारुशीला फल्ले यांचे विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.
योग परिचय वर्गाचे विद्यार्थी स्वप्नील टिबे व अॅड प्रवीण कदम यांनी सूत्रसंचालन केले.योग प्रवेश योग परिचय वर्गाच्या काही साधक बंधू-भगिनींनी मनोगत व्यक्त केले.प्रवीण फल्ले यांनी आभार मानले.












































































