Last Updated on 25 Jun 2023 10:40 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात बी.सी.ए. या नविन अभ्यासक्रमाची सुरवात झाली आहे.संगणक क्षेत्रातील वाढती मागणी व विद्यार्थ्यांचा नवनविन अभ्यासक्रमाकडे जाण्याचा वाढता कल लक्षात घेवून महाविद्यालयात या नविन अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.
मालती कन्या महाविद्यालय हे इस्लामपूर,शिराळा तालुक्यात व परिसरात महिलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते.गेल्याच वर्षी महाविद्यालयास नॅक बेंगलोरकडून ‘ए’ ग्रेड मानांकन व शिवाजी विद्यापीठाच्या एकेडमिक अॉडीट ऑडिट मध्येही ‘ए’ ग्रेड मिळाली आहे.सातत्याने आपली गुणवत्ता राखण्यात महाविद्यालय प्रयत्नशील असते.गेल्याच वर्षी महाविद्यालयाची इतिहास विभागाची किरण मुसळे शिवाजी विद्यापीठात प्रथम येवून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
मेरिट रँकमध्ये प्रथम सलग सहा क्रमांक मिळवणारे मालती महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठात एकमेव आहे.तसेच एकुण चौदा विद्यार्थीनींना शि.वि.मेरीट स्काॅलरशिप मिळाली आहे.प्लेसमेंट कॅंप मधून सात विद्यार्थीनींची मल्टी नॅशनल कंपनीमध्ये निवड झाली आहे.महिलांचे दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून विद्यार्थ्यानी बी.सी.ए. या नविन अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा,असे अवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यानी केले आहे.











































































