Last Updated on 27 Mar 2024 1:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर न्यायालयात सेवा देणाऱ्या २६ विधिज्ञांची भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्यपदी निवड झाली आहे.याबद्दल इस्लामपूर शहर भाजपातर्फे या सर्व विधिज्ञांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या हस्ते पार पडला.यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रमुख सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले -पाटील म्हणाले, भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्यपदी निवड झालेले सर्व वकील इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील सर्वगुणसंपन्न व्यक्ती म्हणून परिचित आहेत. हे सर्व आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक असून त्यांनी अनेक पक्षकारांना न्याय मिळवून दिला व पक्षकार सुद्धा त्याच्यावर डोळेबंद विश्वास करतात ही त्यांची इस्लामपूर न्यायालयात ओळख बनली आहे.सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

यावेळी इस्लामपूर भाजपा शहर मंडल अध्यक्ष अशोक खोत,शहर सरचिटणीस अक्षय पाटील,प्रवीण परीट,माजी नगरसेवक भास्कर कदम,शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे,ओ.बी.सी.सेलचे राज्य कार्यकारणी सदस्य गौरव खेतमर,विधी सेलचे जिल्हा संयोजक ॲड.कौस्तुभ मिरजकर,विधी सेलचे तालुका संयोजक ॲड.सुयोग पाटील यांच्यासह नियुक्ती झालेले सर्व विधिज्ञ व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













































































