Last Updated on 30 Oct 2023 9:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वाळवा तालुक्यात वाढता पाठिंबा
सांगली । मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुका व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयासमोर सकाळी 10 वाजता बी.जी.पाटील हे बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार आहेत.त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वतीने त्याच ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयापर्यंत सुरु राहणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे.वाळवा तालुक्यातही मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत.(सोमवारी) सायंकाळी 6 वाजता मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुका व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्यावतीने इस्लामपूर शहरामध्ये वाळवा पंचायत समिती,क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत (तहसिल कार्यालय) पर्यंत ‘कँडल मार्च’ होणार आहे.
‘कँडल मार्च’ चा मार्ग असा : वाळवा पंचायत समिती- झरी नाका-आझाद चौक- संभाजी चौक- गांधी चौक- यलम्मा चौक – छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असा असेल.)
बी.जी.पाटील हे सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असून व त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वतीने त्याच ठिकाणी साखळी उपोषण सदर उपोषण करण्यात येणार आहे.हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयापर्यंत सुरु राहणार आहे.









































































