Last Updated on 22 Jul 2023 1:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप उबाळे यांची माहिती
सांगली । निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार,एक जानेवारी 2024 पर्यंत छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदाराची घरोघरी पडताळणी होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.त्या अनुषंगाने 283 इस्लामपूर (वाळवा तालुका) व 284 शिराळा (वाळवा तालुका) विधानसभा मतदार संघातील सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दिनांक 14 जुलै 2023 रोजी लोकनेते राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती.सदर बैठकीमध्ये दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेदद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना BLO APP बाबत प्रशिक्षण देण्यात आले.एक जानेवारी २०२४ च्या अर्हता दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण असणा-या सर्व पात्र मतदारांचे मतदार नोंदणी करून घेण्याच्या तसेच मतदार यांचे मतदार यादीतील काही त्रुटी असतील तर तेही दुरुस्त करून घेता येतील याबाबत सूचना देण्यात आल्या.

सदर मोहिमेमध्ये नव मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी असे मतदार नोंदणी अधिकारी यांनी अवाहन केले आहे.सदर बैठकीस सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार प्रदीप उबाळे,सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा अप्पर तहसिलदार श्रीमती.धनश्री भांबुरे,प्र. निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती सीमा सोनवणे,सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – तलाठी भरतीला पुन्हा मुदतवाढ; 25 जुलै रात्री 11.55 पर्यंत करता येणार अर्ज
सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार प्रदीप उबाळे म्हणाले,दि.17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करणेत आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये आपले नाव मतदार यादीत नौद करणेसाठी नमुना नं. 06 चा अर्ज आवश्यक कागदपत्रासह मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय अथवा आपले नजीकचे मतदान केंद्रावर सादर करावा. तसेच यापूर्वीचे मतदार यादीमध्ये नाव नोंद असणा-या सर्व मतदारांनी दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द होणा-या प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नावाची खात्री करावी व मतदार यादीत नाव नोंद करणेसाठी नमुना नं. 6 चा अर्ज आवश्यक कागदपत्रासह आपले नजीकचे मतदान केंद्रावर सादर करावा. तसेच मतदारांना मुख्य निवडणूक अधिकारीसो, महाराष्ट्र राज्य यांचे (www.ceo.maharashtra.gov.in व https://voters.eci.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
283 इस्लामपूर (वाळवा तालुका) व 284 शिराळा (वाळवा तालुका) विधानसभा मतदार संघाची प्रारूप मतदार यादी हि दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाळवा इस्लामपूर तसेच सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार वाळवा इस्लामपूर यांचे कार्यालय, सर्व मतदान केंद्रावर तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारीसो, महाराष्ट्र राज्य यांचे (www.ceo.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावार प्रसिदध होणार आहे.तसेच दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.








































































