Last Updated on 05 Nov 2023 8:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर जवळ 11 लाखांचे १०९ ग्रॅम कोकेन जप्त
सांगली ।
पुणे-बेंगळूर महार्गावर अमली पदार्थ ची तस्करी करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास वाघवाडी (ता.वाळवा ) फाटा येथे पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.त्याच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांनी हस्तगत केले आहे.माकेटो जॉन झाकिया(२५,रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
खासगी ट्रॅव्हल्स मधून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री पोलिसांनी वाघवाडी फाट्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी वाहने अडवून बस (क्र. के.ए.-५१-ए.एफ.६२९१) झडती घेतली. त्यावेळी झाकिया याच्या बॅगेमध्ये १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांना सापडले. कोकेन व झाकिया याचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी वर्दी दिली.झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधि.१९८५ चे कलम १६,२१ नुसार गुन्हा नोंद केला आहे.सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे तपास करीत आहेत.













































































