Last Updated on 22 Mar 2024 9:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक ११ मार्च रोजी समितीचे अध्यक्ष निवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. या बैठकीत निराधारांची २११ प्रकरणे मंजूर करण्यात आली.आजपर्यंतच्या समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे.
बैठकीस तहसीलदार प्रदीप उबाळे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार व्ही.डी. महाजन, वाळवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, इस्लामपूर व आष्टा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत निराधारांच्या एकुण २११ प्रकरणांना मंजुरी देण्यात
आली.यामध्ये विधवा, दिव्यांग, अविवाहित, परित्यक्त्या, दुर्धर आजार, श्रावणबाळ आदी प्रकरणांचा समावेश आहे. यापूर्वीच्या समितीच्या बैठकीत सर्वाधिक १७९ प्रकरणे मंजूर करण्यात आली होती.
सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. वाळवा तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी शोधून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदस्यांनी विशेष प्रयत्न करावेत. असे अवाहन अध्यक्ष निवास पाटील यांनी यावेळी केले.
या बैठकीस सदस्य उत्तम कदम, मुकुंद रास्कर, निलेश बाबर, निलेश कांबळे, वसंत कदम, रफिक (सरगम) मुल्ला उपस्थित होते.











































































