Last Updated on 13 Jul 2022 7:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बैलांच्या मानेवर येणारा भार 80 टक्क्याने होणार कमी
ऊस वाहतूक बैलांना मिळणार दिलासा; त्याचबरोबर अपघाताचे प्रमाण घटणार
सांगली ।
येथील राजरारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजीच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याने ऊस वाहतूक बैलांना दिलासा मिळाला आहे. बैलगाडीसाठी रोलिंग सर्पोट तयार करत नवी कल्पना सत्यात आणली आहे.नुसते पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेतांना नवनवीन प्रयोग करण्यात आरआयटी कॉलेजचे विद्यार्थी नेहमीच पुढे असतात.ऑटोमोबाईलच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी या रोलिंग सर्पोट साठी योगदान दिले आहे.
शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पना वर काम करण्याची संधी मिळते.या ग्रुपने सद्या कशाची गरज आहे.काय अवघड आव्हानान आहे. ते आपण पेलू शकतो याची निवड करताना त्यांना ही कल्पना सुचली.कॉलेजच्या परिसरात राजारामबापू सहकारी साखर कारखाना आहे. इथं ऊस वाहतूकीत बैलगाड्यांना येणाऱ्या समस्या वर संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. त्यांनी सारथी या नावाने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला.

महाराष्ट्रात जवळपास सहकारी आणि खाजगी मालकीचे दोनशेहून अधिक साखर कारखाने सुरू आहेत. त्यालील बहुतांश साखर कारखान्याच्या साधारणतः तीनशे बैलगाडया जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात.
या प्रोजेक्टचे टेस्टिंग हे ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आले आहे. या प्रोजेक्टचे प्रायोगिक तत्त्वावर येणाऱ्या गळीत हंगामात अंमलबजावणी करण्यास प्रयत्नशील असतील. अशा अफलातून संकल्पनेचे वाहनचालक, शेतकरी, कारखानदार या सर्वांमधून कौतुक होत आहे.
रिसर्च निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम,शिवाजी विद्यापीठातून या प्रोजेक्टसाठी १० हजार रुपये निधी मिळाला आहे. या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्ट चे पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

प्रोजेक्टसाठी डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी अभिनंदन केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. आर डी. सावंत व गव्हर्निंग कौंसिल चे चेअरमन मा. भगतसिंह पाटील यांनी या टीमचे कौतुक केले.
बैलगाडीसाठी कसा काम करतो…रोलिंग सर्पोट
शेतात ऊस भरताना लावण्यात आलेला लाकडी तीपाई जमीनीत घुसने व मोडणे,बैलांवर अतिभार,रस्त्यांवर स्पीडब्रेकर खड्यांमुळे पाय घसरने,पाय मुरगळणे व कधी कधी पाय मोडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड दयावे लागते.यामुळे बैलाला दुखापत तसेच बैल चालकाचे आर्थिक नुकसान होते.यावर त्यांनी अफलातून संकल्पना तयार करत कामाला सुरवात केली.त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले जे बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते,हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त वर खाली करू शकतो,तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो.











































































