Last Updated on 02 Oct 2024 8:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आजरा महाविद्यालय, आजरा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ स्तरावरील मध्यवर्ती युवा महोत्सव स्पर्धेमध्ये इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
तीन दिवस हा मध्यवर्ती युवा महोत्सव सुरू होता. शिवाजी विद्यापीठ कक्षेतील सर्व महाविद्यालयांमधून इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद प्रथम क्रमांक, एकल लोक वाद्यवादन प्रथम क्रमांक, मुकनाट्य द्वितीय क्रमांक, शास्त्रीय तालवाद्य द्वितीय क्रमांक, इंग्रजी वक्तृत्व उत्तेजनार्थ, शास्त्रीय गायन उत्तेजनार्थ, कातरकाम उत्तेजनार्थ; असे पारितोषिक मिळवत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये महाविद्यालयाचा ठसा उमटवला.
यामध्ये महविद्यालयाचे ३५ विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते, यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल चांदेकर, डॉ. जी. के. किर्दत, डॉ. अशोक शिंदे, डॉ.मंगल लोंढे, प्रा.गणेश स्वामी, प्रा.प्राची कांबळे,प्रा.पी.एन.पाटील तसेच दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत पाटील (श्रीजा फाऊंडेशन, कोल्हापूर), शैलेश शिंदे, आदिनाथ झेंडे, अक्षय हांडे, मयुरेश शिखरे, किरण पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.













































































