Last Updated on 03 Nov 2023 7:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | इस्लामपूर शहरातील वहातुक कोंडी व पार्किंगबद्दल युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी चिंता व्यक्त करून शहरातील वहातुक व्यवस्था सुरळीत व नियमित करण्याबद्दल त्यांनी इस्लामपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांना पत्र लिहिले आहे.
शहरातील नागरिक,व्यापारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी,महिला आदी घटकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.
इस्लामपूर शहरात गेल्या अनेक वर्षा पासून वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या नित्याचीच झाली आहे.शहरातील गणेश मंडई,गांधी चौक,यल्लाम्मा चौक,आझाद चौक,शिराळा नाका आदी भागात कायमच वाहनांची कोंडी झालेली असते.याचा शहरा तील नागरिक,व्यापारी,तसेच तालुक्यातून शहरात येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे.
गतिमान व विना अडथळा दळणवळण हे प्रगतीचे उत्तम साधन आहे.प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून वाहतुकीच्या नियमाप्रमाणे झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारावे लागतील. तसेच वेग नियंत्रण करणारे रबरी पट्टेही मारून घ्यावे लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे सांगली- पेठ रस्त्यावरील सिग्नल सुरळीत करून या रस्त्यावरील वहातुक अडथळे दूर करावे लागतील,अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे.










































































