Last Updated on 21 Jun 2023 9:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मोदी@9 अभियान कार्यक्रम अंतर्गत इस्लामपुर विधानसभा प्रमुख व भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेल्या जागतिक योगदिना ला युवक,युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
इस्लामपुर विधानसभा प्रमुख व भाजपा चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा) म्हणाले योग हा खुप प्राचीन प्रकार असुन संपुर्ण जगातील १८३ देशात आज जागतिक योग दिन साजरा केला जातो,केंद्रातील मोदी सरकार ला नऊ वर्ष पुर्ण झाले व आज जागतीक दिनाचा नववा वर्धापन दिन हा योगायोग म्हणावा लागेल,स्वस्थ व चांगले आरोग्य लाभावे म्हणुन योग केला जातो,योगा चे महत्व देशातील प्रत्येक घटकापर्यत पोहचावे म्हणुन आज संपुर्ण देशभर व जगामध्ये जागतिक योगदिन साजरा केला जात आहे,देश महासत्ताकडे वाटचाल करीत असला तरी देशातील प्रत्येक नागरीकाचे आरोग्य निरोगी राहाणे तितकेच महत्व असल्याचे सांगितले.
यावेळी योग अध्यापक रमेश यादव,योग पंडीत शशीकांत माने,डाॅ.राहुल नाकील यांनी व उपस्थितांनी योगा चे सादरीकरण केले.
यावेळी सांगली जिल्हा भाजपाचे सरचिटणीस संजय हवलदार,कोषाध्यक्ष संजय पोरवाल,भाजपा शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट,प्रांजली अर्बन बॅकेचे चेअरमन अक्षय पाटील,भाजपा अल्पसंख्याक चे अध्यक्ष अल्ताफ तहसिलदार,भाजपा जिल्हा सरचिटणिस संदिपराज पवार,दिनकर कोळेकर,डाॅ.विरेंद्र मिनकिरे,डाॅ.भुपाल गिरीगोसावी,डाॅ.श्वेता नाकील,डाॅ.हेमलता मिनकिरे,डाॅ.सोनल शहा,डाॅ.अमित शेडगे,डाॅ.अनुपमा पाटील,डाॅ.कोमल किर्ते आदी प्रमुख उपस्थित होते.









































































