Last Updated on 22 Nov 2022 1:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय येथे जात पडताळणीचे विशेष शिबिर संपन्न झाले.या शिबिरात जागेवरच अर्ज स्विकारण्यात आले.
राज्यभर मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे,या अनुषंगाने आज इस्लामपूर येथे जात पडताळणी अर्ज स्विकारण्यात आले.यापूर्वी इस्लामपूर येथील कुसुमताई व विद्यामंदिर येथील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जात पडताळणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, लागणारे पुरावे ,अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपायुक्त मा खुशाल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते,यामध्ये दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन अर्ज केलेले होते,आज त्यापुढील टप्पा पूर्ण करण्यात आला,कॉलेजवरच परिपूर्ण अर्ज तपासून स्वीकारण्यात आले.
यामुळे अकरावी आणि बारावी सायन्स मधील विद्यार्थ्यांना त्वरित जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार आहे, व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी होणारी असे हेलपट थांबणार आहे,आज झालेल्या या शिबिरासाठी वाळव्या तालुक्यातून विविध महाविद्यालयातून विद्यार्थी उपस्थित होते,या शिबिरासाठी साठी जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे उपायुक्त खुशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले ,संशोधन अधिकारी संभाजी पवार प्रकल्प अधिकरी गणेश सवाखंडे,संशोधन सहाय्यक समीर पटेल, अभिजीत स्वामी, समतादूत विक्रांत शिंदे अंकुश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.कॉलेजचे प्राचार्य डॉ विलास काळे, प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभले.














































































