Last Updated on 20 May 2024 2:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील रत्ना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने दि. २३ ते २७ मे या कालावधीत कृषी मॉल,वाघवाडी रोड (ता. वाळवा) येथे फळे,कडधान्य व आंबा महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती वैभव कोकाटे यांनी दिली.
कोकाटे म्हणाले, सर्व सामान्यांना चांगल्या प्रतीची फळे, कडधान्ये व दर्जेदार आंबा उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांना देखील बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. शेतकऱ्यांनी या महोत्सवात फळे, कडधान्ये व आंबाविक्रीसाठी आणावा. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभाग कोल्हापूर, यांनी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केलेला आहे. पिण्याचे पाणी, विजेसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर फळे व धान्य महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील धान्य उत्पादक व फळ उत्पादक शेतकरी यांचेसाठी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ५० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सदर महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभव कोकाटे यांनी केले आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा 








































































