Last Updated on 02 Apr 2022 9:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ITI उत्तीर्ण उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,इलेक्ट्रिशियन आणि फिटरमधील कनिष्ठ तंत्रज्ञांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 1625 रिक्त पदे भरली जाणार आहेत.1 एप्रिल 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण पदसंख्या : 1625 Posts.
पदाचे नाव
| NAME OF THE POST | TRADE | NO. OF VACANCY | |
|---|---|---|---|
| ज्युनियर टेक्निशियन | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 814 | |
| इलेक्ट्रिशियन | 184 | ||
| फिटर | 627 | ||
| Total | 1625 |
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन किंवा फिटरच्या ट्रेडमध्ये 2 वर्षांचे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय एक वर्षाची अप्रेंटिसशिप (कौशल्य विकास मंत्रालयाने जारी केलेली NAC) अनिवार्य आहे. एक वर्षाहून अधिक अनुभव असल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ECIL च्या कोणत्याही कार्यालयात (संपूर्ण भारत) आणि त्याच्या ग्राहकांच्या साइटवर पोस्टींग मिळू शकते आणि आवश्यकतेनुसार 24-तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी हवी. अर्जदारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शेवटची तारीख : 11 April 2022
वयाची अट : 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतन (Pay Scale)
दुसरे वर्ष – 22558 रुपये
तिसरे वर्ष- 24780 रुपये
सूचना : पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा












































































