Last Updated on 03 Feb 2024 5:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.5 फेब्रुवारी पासून खास महिलांच्यासाठी ‘जयंत महोत्सव’ आयोजित केलेला आहे.
महिलांचे हळदी- कुंकू,तिळगुळ व वाण वाटप आणि मनोरंजन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.प्रसिध्द समालोचक मोनिका करंदीकर,नितीन गवळी हे संयोजन करणार आहेत.महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जयंत महोत्सव’चा मनमुराद आनंद लुटावा,असे आवाहन महिला राष्ट्रवादी च्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी केले आहे.
बाईचा जन्म म्हणजे अनेक अडचणींचा सामना..म्हणून आम्ही ‘बाईपण,भारी देवा’हे ब्रीद घेतले आहे.प्रत्येक महोत्सवात 3 पैठणी,50 आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. दि.5 फेब्रुवारीपासून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मुख्य गावात सकाळी 11 ते 3 या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
महोत्सव कार्यक्रम असा
दि. 5 फेब्रुवारी- कामेरी जिल्हा परिषद
दि. 7 फेब्रुवारी-बावची जिल्हा परिषद
दि. 9 फेब्रुवारी-वाळवा जिल्हा परिषद
दि. 10 फेब्रुवारी -बागणी जिल्हा परिषद
दि. 12 फेब्रुवारी-डिग्रज सर्कल
दि. 14 फेब्रुवारी-बोरगाव जिल्हा परिषद
दि. 15 फेब्रुवारी-रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद
दि. 17 फेब्रुवारी-पेठ जिल्हा परिषद
दि. 18 फेब्रुवारी- चिकूर्डे जिल्हा परिषद
दि. 21 फेब्रुवारी-येलूर जिल्हा परिषद
दि. 22 फेब्रुवारी-कासेगाव जिल्हा परिषद
दि. 25 फेब्रुवारी- वाटेगाव.
महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,प्रदेश सरचिटणीस छाया पाटील, प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्यासह गावातील अध्यक्षा,त्यांच्या सहकारी कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.










































































