Last Updated on 20 Mar 2025 11:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्याची निशिकांत भोसले-पाटील यांची माहिती
मुंबई : आष्टा व विटा शहरातील यशवंतनगर येथील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ पाठविणेबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश असल्याची माहिती भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आष्टा व विटा शहरातील प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला आ. सुहास बाबर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, प्रविण माने यांची प्रमुख उपस्थित होती.
आष्टा तालुका वाळवा येथील जमिनी १९३१ मध्ये सरकारी जमिनी लिलावात खरेदी करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी दीड हजाराहून अधिक मिळकत धारक असून गुंठेवारी विकास अधिनियम २००१ प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हे मिळकत धारक या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यावेळच्या धोरणानुसार म्हणजेच ५ टक्के दस्त नोंदणी (रेडी रेकनर) दर आकारण्यात येऊन संबधीत प्लाॅटधारकांना कायम हक्क देण्यात यावा अशी मागणी ना.बावनकुळे यांच्याकडे निशिकांत भोसले-पाटील यांनी केली होती.
याचबरोबर विटा शहरातील यशवंतनगर येथील सुमारे १२५ प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सुमारे ६५ वर्षांपूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉट धारकांनी नियमाप्रमाणे सरकारी रक्कम भरलेली होती. सर्वांनी या ठिकाणी घरे बांधून वास्तव्य केलेले आहे. मात्र, अनावधानाने शर्तभंग झालेला आहे. या प्लॉट धारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामुळे प्लॉटधारक भयभीत झाले होते. त्यांना वर्ग दोन मधून भोगवटादार एक मध्ये परावर्तीत करण्याची विनंती आ.सुहास बाबर यांनी केली होती त्यानुसार आज मंत्रिमहोदयांच्या दालनात बैठक संपन्न झाली.
यावेळी ना.बावनकुळे यांनी दोन्ही शहरातील प्रश्न कायम सोडविण्याच्यादृष्टीने सरकार सकारात्मक असुन याबाबत बैठकीतच जिल्हाधिकारी सांगली यांना सदर विषयाचे दोन्ही शहराचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्याचे आदेश भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी सांगितले. .यामुळे दोन्ही शहरातील हे प्रश्न कायमस्वरुपी सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more












































































