Last Updated on 10 Jul 2022 3:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. वारकरी परंपरा आणि पंढरपुरातले भक्तिमय वातावरण याचे महत्त्व यापूर्वीच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते. या भागातील हा अंश देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
” आषाढी एकादशीच्या या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. भगवान श्रीविठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत आणि आपल्या समाजात आनंदाची भावना वृद्धिंगत होऊ दे. वारकरी परंपरा आणि पंढरपुरातील भक्तिमय वातावरण याविषयी यापूर्वीच्या #MannKiBaat मध्ये मी सांगितले होते तो अंश मी सामाईक करत आहे.”
Greetings on the sacred occasion of Ashadhi Ekadashi. May the blessings of Bhagwan Vitthal remain upon us and further spirit of happiness in our society. Sharing a snippet from an earlier #MannKiBaat in which we talked about the Warkari tradition and the divinity of Pandharpur. pic.twitter.com/HvuHqXDMwJ
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2022
काही आठवड्यांपूर्वी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.
त्यांनी ट्वीट केले आहे:
” काही आठवड्यांपूर्वी मी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देहू येथे गेलो होतो. माझ्या भाषणात महान वारकरी संत आणि महात्म्यांचे उदात्त विचार मी अधोरेखित केले होते आणि आपल्या सर्वांना त्यामधून काय शिकता येईल त्याविषयी बोललो होतो.”
त्याशिवाय पंतप्रधानांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये वारकरी परंपरेविषयी केलेले भाषण देखील सामाईक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः
” पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन करण्याचा बहुमान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मला प्राप्त झाला होता. भारताच्या युवा वर्गामध्ये वारकरी परंपरा आणखी लोकप्रिय करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.












































































