Last Updated on 17 Jul 2024 4:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र भूषण,शिक्षण महर्षी, माजी जेष्ठ मंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा,राज्यात आदर्शवत असणारी सूतगिरणी व शैक्षणीक संकुलात वाढ दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिरे व विविध वृक्षांचे रोपण हा सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.विविध संस्थाची उभारणी करत असताना त्याचे नेटके नियोजन व आदर्श कारभार वाखाणण्याजोगा आहे.असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर महेंद्र लाड यांनी व्यक्त केले.
येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावरडॉ. आण्णासाहेब डांगे यांच्या ८८ व्या वाढ दिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व रक्तदान शिबीर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
प्रारंभी महेंद्र लाड,माजी आमदार भगवानराव साळुंखे,अँड. बी. एस. पाटील,प्रा. डॉ. अरुण घोडके,माजी नगरसेवक अशोकराव पाटील, माजी बांधकाम सभापती जगन्नाथराव माळी,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक बाळासाहेब पाटील, संदीप विजभाऊ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील,शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळकंठ यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
रक्तदान शिबीराचे उदघाटन महेंद्र लाड व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे,अँड. बी. एस. पाटील,प्रा. डॉ. अरुण घोडके,प्राचार्य विश्वास सायनाकर,रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर खोत, कॉग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनिषा रोटे, लोकराज्य विद्या फौंडेशनचे चंद्रशेखर तांदळे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक अँड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, माजी नगरसेवक शहाजीबापू पाटील,माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या इस्लामपूर शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,सुभाष सुर्यवंशी,मार्केट कमिटीचे संचालक सी.एच. पाटील, विकासराव नांगरे,अनिल पावणे,य.मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात,शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे, प्रकाश कनप,किसान उद्योग समुहाचे संस्थापक शोकराव देसाई,सुनिल मलगुंडे,व्ही.टी. पाटील,अशोकराव पाटील,अभिजित रासकर,अर्जुन धोत्रे,अशोकराव बारपठे,धनपाल माळी,भानुदास मोटे,अदिनाथ कपाळे,रोहन बाबर,सुजित डाळे,शांतीसागर कांबळे,संदीप माने,राजेंद्र गावडे,माणिक पाटील, गणपती वाटेगांवकर,दत्तात्रय पवार,संग्राम माने,वाघवाडीचे माजी सरपंच राजाराम लाड,मानसिंगराव वाघ,दिनकरराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
प्रमुख पाहूणे व मान्यवरांचा सत्कार सूतगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी,एम. एन. कांबळे,सुमंत महाजन,रमेश वडे,राजेंद्र लोंढे,मंगश लवटे,उमेश गावडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार व फेटा देवून करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब खैरे यांनी केले.सुत्रसंचालन व संयोजन बजरंग कदम यांनी केलेआभार संचालक प्रकाश बिरजे यांनी मानले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन एस. आय. मेत्री,मंगेश लवटे,विलास फाटकयांनी केले.रक्तदान शिबीराचे संयोजन लेबर ऑफीसर अदित्य यादव,डी. एस. पाटील,मॅनेजर आनंदराव मिठारी,एच. आर. पाटील,प्रशांत जाधव,संतोष माने,विजय कवठेकर,संजय कुशिरे,संजय ताटे यांनी केले.सत्कार समारंभ नियोजन प्रकाश दगडे,अभिजित बारपटे,विजय पाटील यांनी तर वाढदिवस कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनरल मॅनेजर व्ही. एस. देशमुख,फायनान्स मॅनेजर आर.एस. मिरजे व प्रोडक्षण मॅनेज रसुर्यकांत देसाई यांनी विशेष परिश्रम केले.राजारामबापू रक्तपेढी मार्फत रक्त संकलनाचे काम करण्यात आले यावेळी कार्यकर्ते,अधिकारी व कामगार यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले कार्यस्थळावर एकूण १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.नारळ,चिक्कु,आंबा,साग,वड,पिंपळ व आयुर्वेदीक वनस्पतींचे वृक्षारोपण कार्यस्थळावर व शैक्षणिक संकुलात करण्यात आले.
डॉ. आण्णासाहेब डांगे यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे खासदार,आमदार, विविध राजकिय पक्षांचे प्रदेश अध्यक्ष, राज्य पदाधिकारी,विविध संघटनांचे प्रमुख,समाज बांधव अशा राज्यभरातुन हजारो मान्यवरांनी दूरध्वनीवरून तसेच अनेकांनी पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेटून वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.









































































