Last Updated on 14 Oct 2023 6:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
Asthama Treatment : बदलती जीवनशैली तसेच ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरीकांना दम्याचा धोका अधिक असल्याचे विविध सर्वेक्षणांतून दिसून आले आहे.मात्र,होमिओपॅथीमधील नवीन उपचारपद्धतीमुळे आता दमा झालेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.कराड येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ् डॉ. उत्तमकुमार बारकी यांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या औषधामुळे आता अस्थामावर (दमा) खात्रीशीर उपाय शक्य असल्याचे दिसून आले आहे.
वाढतं शहरीकरण,गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.इन्हेलर पंप थेरपीद्वारे दम्यावर उपचार करता येतात.आता काही प्रकारच्या बिकट दम्यावर ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी या अत्याधुनिक उपचारपद्धतीद्वारे इलाज केले जातात.
दरम्यान,कराड येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ् डॉ. उत्तमकुमार बारकी यांनी दम्याच्या आजारावर गेल्या काही काळापासून संशोधन सुरु केले होते.या संशोधनातून तयार झालेल्या औषधांमुळे दम्याच्या रुग्णांना होणारा त्रास कमी होऊ लागला आहे.
कराड येथील रेणुका होमिओ क्लिनिकचे डॉ. बारकी यांच्या संशोधनातून निर्माण झालेले आणि सुमारे 28 वर्षाच्या प्रदिर्घ अनुभवातून तयार झालेले हे दम्यावरील औषध प्रभावी ठरत असल्याचे अनेक रुग्णांच्या प्रतिक्रियेतून दिसत आहे.
दमा अर्थात अस्थमा : श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होते.त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे असे समजावे.दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराचं लक्षणं असल्याचे दिसून येऊ शकते.बालपणात विकसित झालेल्या रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस इन्फेक्शन (RSV) सारख्या विषाणूजन्य संसर्गाचा वैद्यकीय इतिहास असलेल्या लोकांना दमा होण्याची शक्यता जास्त असते.
दम्याची चिन्हे आणि लक्षणे कोणती ?
जरी दम्याची लक्षणे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये बदलत असली तरी, दमा असलेल्या लोकांमध्ये सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे घरघर.
- खोकला,विशेषत: रात्री किंवा बोलत असताना, हसताना किंवा व्यायाम करताना
- श्वासोच्छवासाचा त्रास,
- बोलण्यात त्रास होणे,
- सततच्या खोकल्यामुळे थकवा,
- संसर्ग होण्याची शक्यता,
- छातीच्या भागात वेदना आणि घट्टपणा,
- श्वास बाहेर टाकताना घरघर येणे- मुलांमध्ये दम्याचे सामान्य लक्षण,
- श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला येणे किंवा रात्री घरघर येणे यामुळे झोप येण्यास त्रास होणे,
- व्हायरल इन्फेक्शन, सर्दी आणि सामान्य फ्लूमुळे खोकला किंवा घरघर अधिक वाढते.












































































