Last Updated on 28 Dec 2022 8:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विद्रोही साहित्य विचारमंच,पुणे यांच्यावतीने दिला जाणारा ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हा साहित्य पुरस्कार अनिता दिलीपकुमार कांबळे यांच्या ‘पिंपळपान’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
सोमवार दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी तिसऱ्या विद्रोही साहित्य स्नेहसंमेलनात संमेलनाध्यक्ष मा. डॉ.प्रतिमा इंगोले (ज्येष्ठ साहित्यिका )यांच्या हस्ते पुणे येथे दिला जाणार आहे.याप्रसंगी कवयित्री छाया कोरेगावकर आणि संजीवनी राजगुरू उपस्थित राहणार आहेत.या अगोदर मराठी साहित्य मंडळ, ठाणे या प्रख्यात संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय” सावित्रीबाई फुले साहित्य भूषण” पुरस्कार ‘ पिंपळपान ‘ काव्यसंग्रहासाठी प्राप्त झाला आहे.
यापूर्वी उस्मानाबाद येथे खासदार मा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते ‘पिंपळपान’या काव्यसंग्रहासाठी राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात होते.










































































