Last Updated on 27 Oct 2024 3:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवार यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ दाते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार गटामध्ये असलेल्या निलेश लंके यांनी शरद पवार गटात जात नगरमधून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये पारनेर विधानसभा मतदार संघातून त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. तर दादा गटाने त्यांच्याविरूद्ध काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.











































































