Last Updated on 16 Mar 2022 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
कोरोना काळापासून आमदारांच्या निधीवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी उघडपणे निधीवरून नाराजी व्यक्त केली होती.पण,अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी आमदारांना 5 कोटींचा निधी जाहीर केला आहे. एवढेच नाहीतर आमदारांचे पीए आणि ड्रायव्हरला सुद्धा पगारवाढ जाहीर केली आहे.
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे.आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरुन पाच कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व आमदारांना ५ कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.












































































