Last Updated on 03 Oct 2022 7:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धान्याची माहिती http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास मिळणार
पुणे | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य घेतल्यानंतर स्वतंत्र पावत्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी योजनानिहाय मिळणाऱ्या धान्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास होणार आहे.
सर्व लाभार्थ्यांनी दोन्ही धान्य मिळाल्यानंतर स्वतंत्र दोन पावती स्वस्त धान्य दुकानदारांमार्फ़त घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.












































































