Last Updated on 09 Jul 2025 6:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वृक्षारोपण, गरजू महिलांना अन्नधान्य किट; उपक्रमानी वाढदिवस साजरा…
सांगली । शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य, येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात झाला. यानिमित्ताने मंगळवार दिनांक ८ रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले.
समाजातील विविध स्तरातील मान्यवरानी ॲड.पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी खासदार एस.डी. पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष सौ. अरुणादेवी पाटील, सौ. हर्षाली धैर्यशील पाटील व प्राचार्य सौ. एस. एस. पाटील व डॉ. सौ. मेघा संजय पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. ॲड. बी. एस. पाटील, संजय पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने मंगळवारी ऍड धैर्यशील पाटील युवा मंच व मित्र परिवाराच्या वतीने संस्थेच्या कॅम्पसमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले यशवंतराव चव्हाण ब्लड बँक यांनी संयोजन केले. याप्रसंगी गरजू महिला बहिणींना अन्नधान्यची किट देण्यात आली. संस्थेच्या कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
उद्योजक सुरेंद्र दादा पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, शहाजी बापू पाटील, खंडेराव जाधव, आयुब हवलदार, जयवंत मोरे व मित्रपरिवार रेठरेहरणाक्ष, अर्जुन पाटील ताकारी, सुजित थोरात वाळवा, तांदुळवाडी चे उपसरपंच प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल पाटील, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रतिभा पाटील, धनंजय पाटील,काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र पाटील आदी अनेक मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.













































































